दिल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत नवले पुलावरील अपघातांची मालिका, वाढती वाहतूक कोंडी, नागरिकांचे होणारे मृत्यू तसेच सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा सविस्तरपणे मांडण्यात आला. या संपूर्ण विषयासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
advertisement
बैठकीदरम्यान एलिव्हेटेड ब्रिजची मागणी आग्रहीपणे मांडण्यात आली. यावर मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला तातडीची मंजुरी दिली. तसेच सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेशही दिले. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करून सर्व प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत एलिव्हेटेड ब्रिजच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.
या निर्णयामुळे नऱ्हे, वडगाव बुद्रुक, आंबेगाव, वारजे तसेच या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे.






