ही धक्कादायक घटना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (१५ ऑगस्ट) दौंड शहरातील इंद्रानगर भागात डली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल थोरात नावाच्या तरुणाने आपल्या आईच्या अनैतिक संबंधांमुळे तिचा प्रियकर प्रवीण पवार याचा खून केला. विशाल याला आपल्या आईचे आणि प्रवीण पवारचे संबंध मान्य नव्हते. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते.
advertisement
गुरुवारी सायंकाळी हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात विशालने प्रवीण पवार याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. डोक्यात, तोंडावर आणि हातावर झालेल्या या गंभीर हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
याप्रकरणी पोलिसांनी विशाल थोरात याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आईच्या अनैतिक संबंधांमुळे एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलून खून केल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे समाजात अनैतिक संबंधांचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.