तळेगाव उरुळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाला चाकण औद्योगिक क्षेत्रातील 12 गावांसह मावळ हवेली तालुक्यातील शेतक-यांनी ठरावपूर्वक विरोध दर्शवलाय. यावरुन शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी मेळाव्यातून या प्रकल्पाला थेट विरोध करत नांदती घरे मोडून विकास होत नाही, विकास हवा असेल तर नांदती घरं मोडायची नसतात,’ अशा शब्दांत सुनावलं.
मावळ आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला
advertisement
चाकण औद्योगिक क्षेत्रातील १२ गावे तसेच मावळ आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट भूमिका घेत ,ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.यावेळी बोलताना खासदार कोल्हे यांनी विकास हवा असेल तर नांदती घरं मोडायची नसतात, असे सांगून रेल्वे प्रशासनाला इशारा दिला. तसेच, 'हात जोडता येतात, पण गरज पडल्यास मुठीही वळवता येतात' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रेल्वे बायपास प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता
दरम्यान या प्रकल्पामुळे चाकणमधील १२ गावांमधील आणि मावळ, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. आधीच एमआयडीसी, रिंगरोड आणि महामार्गांसाठी जमिनी गेल्या असताना आता रेल्वेसाठीही जमीन का द्यायची, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधामुळे हा रेल्वे बायपास प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.