मुंबई-पुणे महामार्गावर जुलै २०२४ पासून इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या स्वयं-चालित प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. या प्रणालीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर स्वयंचलित पद्धतीने कारवाई करणे शक्य झाले आहे. या महामार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून ३६ लाख चलनं कापण्यात आली असून, त्यांच्यावर तब्बल ६०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्वयं-चालित प्रणालीद्वारे कापल्या गेलेल्या चालानमध्ये लेन कटिंग आणि ओव्हर स्पीडिंगच्या नियमांचे उल्लंघन सर्वाधिक आहे. ओव्हर स्पीडिंग करणाऱ्यांवर थेट चालान जारी केले जात आहे. इतर नियमांचे उल्लंघन झाल्यास, त्याची शहानिशा करून दंड ठोठावला जात आहे. आयटीएमएसमुळे महामार्गावरील वाहतूक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी मदत मिळत असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरटीओने केले आहे. आतापर्यंत 5 लाख 38 हजार चलान निकाली काढण्यात आले असून ९० कोटी रुपांपेक्षा जास्त दंडाची वसूली करण्यात आली आहे.
advertisement
या महामार्गावर 40 गॅन्ट्री आणि जागोजागी अनेक कॅमेरे बसवले आहेत. त्यात स्पीड डिटेक्शन, एएनपीआर, वेट इन मोशन सेन्सर्स, कमांड अँड कंट्रोल सेंटर अशा काही सुविधा या सीसीटीव्हीमध्ये असणार आहेत. एकूण 36 लाख रुपयांचं चलान आहे. त्यापैकी ५.३८ लाख निकालात काढलेले आहेत. एकूण दंड 600 कोटी असून वसूल केलेला दंड जवळपास 900 कोटी आहे.
