पुणे : मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं आता थेट दहापदरीकरण होणार आहे. दहापदरीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) अखेर प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 16 हजार कोटी रुपयांचा भव्य खर्च अपेक्षित आहे.
या महामार्गावरील सततची होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर करणे, प्रवासाची गती वाढवणे आणि भविष्यात मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) वाढता विकास ECf वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन एमएसआरडीसीने हा निर्णायक बदल केला आहे.
advertisement
मुंबईकरांचा 18 तास खोळंबा! ‘एल्फिन्स्टन’च्या पाडकामासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 8 ब्लॉक घेणार
यापूर्वी एमएसआरडीसीने सहापदरी असलेल्या या महामार्गाचे आठपदरीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, भविष्यातील वाहतूक घनतेचा अंदाज घेत काही महिन्यांपूर्वी हा आठपदरीकरणाचा प्रस्ताव रद्द करून थेट दहापदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
Pune News: नवले पूल अपघातानंतर मोठा निर्णय, पुण्यातील ‘हा’ रस्ता कायमचा बंद!
महामार्गाचे दहापदरीकरण झाल्यास, मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास केवळ वाहतूक कोंडीमुक्त होणार नाही, तर तो अतिजलद आणि अधिक सुरक्षित होण्यास मोठी मदत मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून होणारा विकास पाहता एमएसआरडीसीने पदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतलं. राज्य सरकारकडून लवकरच या 16 हजार कोटींच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास पुणे मुंबई प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होईल
