मुंबईकरांचा 18 तास खोळंबा! ‘एल्फिन्स्टन’च्या पाडकामासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 8 ब्लॉक घेणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी 8 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यातील एक ब्लॉक सलग 18 तासांचा असणार आहे.
मुंबई: मुंबईकरासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर सलग 18 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाची प्रक्रिया सुरू असली, तरी रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम प्रलंबित होते. आता हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक देण्याची तयारी दर्शवली आहे.
125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम अर्धवट
वरळी–शिवडी उन्नत मार्गासाठी 125 वर्षांचा ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल हटविणे आवश्यक आहे. पुलाच्या पूर्व-पश्चिम दिशेतील भाग आधीच काढण्यात आला असला तरी रेल्वे मार्गावरील संरचना गेल्या महिन्याभरापासून हटवता आलेली नाही. ‘महारेल’ने नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाकाय क्रेन उभ्या करून पाडकामाची तयारी केली, मात्र ब्लॉक न मिळाल्याने त्या निष्क्रिय राहिल्या आहेत.
advertisement
महारेल–मध्य रेल्वे बैठकीत निर्णय
उच्चस्तरीय चर्चेनंतर मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक मंजूर करण्यास सहमती दर्शवली—
1 ब्लॉक : सलग 18 तासांचा
7 ब्लॉक : रात्री 12 ते 3 या वेळेत प्रत्येकी 2 तासांचे
या ब्लॉकचे नेमके वेळापत्रक मध्य रेल्वे लवकरच जाहीर करणार असून, प्रवाशांना त्याची आगाऊ माहिती दिली जाईल.
advertisement
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम
या ब्लॉकमुळे लोकल तसेच मेल–एक्स्प्रेस गाड्यांची सेवा दिवसरात्र विस्कळीत होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ब्लॉकचे नियोजन काळजीपूर्वक केले जाणार आहे. मध्य रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असून, अंतिम मान्यता मिळाल्यावरच प्रत्यक्ष पाडकाम सुरू होणार आहे.
पाडकाम सुरू होण्यासाठी अजून 15-20 दिवस
view commentsमान्यता प्रक्रियेमुळे एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घेण्यासाठी किमान 15 - 20 दिवस अतिरिक्त लागण्याची शक्यता आहे. यामुळे जागेवर निष्क्रिय उभ्या असलेल्या महाकाय क्रेनच्या लाखो रुपयांच्या भाड्याचा बोजा ‘महारेल’वर वाढत चालला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2025 10:13 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांचा 18 तास खोळंबा! ‘एल्फिन्स्टन’च्या पाडकामासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 8 ब्लॉक घेणार


