Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपून वापरा, 11 विभागातील पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं?

Last Updated:

Mumbai Water Cut: मुंबईकरांना पुढील काही दिवस पाण्याचा वापर जपून करावा लागेल. 11 विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपून वापरा, 11 विभागात पाणीपुरवठा बंद, कधी आणि कुठं?
Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपून वापरा, 11 विभागात पाणीपुरवठा बंद, कधी आणि कुठं?
मुंबई: मुंबईकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावं लागेल. शहरातील पाणीपुरवठा मजबूत करण्याच्या दृष्टीने महापालिकेने महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सोमवारी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अमर महल भूमिगत बोगद्याच्या शाफ्ट क्रमांक 1 आणि 2 यांना जोडणाऱ्या 2500 मिमी जलवाहिनीचे छेद जोडण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. हे काम सुमारे 30 तास चालणार असल्यामुळे 11 प्रशासकीय विभागांमध्ये पाण्याचा दाब कमी राहणार किंवा पुरवठा पूर्णपणे बंद होणार आहे.
नियोजित काम 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन 2 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील. घाटकोपर (पूर्व) येथील छेडानगर जंक्शन परिसरामधील 3000 मिमी मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडण्याचे काम हा या प्रकल्पाचा प्रमुख टप्पा आहे. जलवाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे काम करण्यात येत आहे.
advertisement
या कामामुळे शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस आणि एन या 11 विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी उपलब्ध होईल.
advertisement
महापालिकेने या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत पाणी गढूळ किंवा कमी दाबाने येण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकर पाणी जपून वापरा, 11 विभागातील पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement