कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर
पण आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकरचा सगळ्यात जवळच्या शूटरला बेड्या ठोकल्या आहेत. मुनाफ पठाण असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आयुष कोमकरची हत्या झाल्यापासून पठाण फरार झाला होता. आता अखेर १३ दिवसांनी पोलिसांनी मुनाफला बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
आयुष कोमकर हत्याकांडात मुनाफ पठाणची भूमिका काय?
आयुष कोमकर हत्या प्रकरणाचा तपास करताना मुनाफ पठाण याचाही या हत्याकांडात सहभाग असल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती. यानंतर पोलिसांनी त्यालाही या गुन्ह्यात आरोपी केलं. त्यानेच आयुषची हत्या करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. मुनाफ पठाणच्या अटकेनंतर कोमकर हत्या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या १३ वर गेली आहे.
पठाणला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात नेमका रोल काय आहे? त्याचा या सगळ्या प्रकरणात सक्रिय सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
अटकेतील आरोपींची नावं
बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे आणि सुजल मिरगू. आता पोलिसांनी मुनाफ पठाणला देखील अटक केली आहे.