साप पुंगीच्या तालावर डोलतो?
हा चित्रपटामुळे पसरलेला गैरसमज आहे. सापाला कान नसल्यानं त्याला ऐकू येत नाही. तो हलणाऱ्या वस्तूवर हल्ला करण्यासाठी तसंच स्वरक्षणासाठी त्यावर लक्ष ठेवून असतो. साप पुंगीच्या हलचालीप्रमाणे फणा हलवतो. त्यामुळे आपल्याला तो पुंगीच्या तालावर डोलत असल्याचा भास होतो, अशी माहिती कदम यांनी दिली.
advertisement
म्हशीच्या पायाला विळखा घालून धामण,साप दूध पितात ?
म्हशीच्या पायाला विळखा घालून धामण दूध पिते, किंवा साप दूध पितो, असाही एक गौरसमज आहे. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे. साप हा सस्तन नाही तर सरपटणारा प्राणी आहे.
सापाच्या अंगावर केस असतात ?
सस्तन प्राण्याच्या अंगावर केस असतात, सरपटणाऱ्या नाही. साप ठराविक दिवसांनी कात टाकतात. त्याची कात व्यवस्थित न निघाल्यास पांढऱ्या केसांसारखी दिसते त्यामुळे सापाच्या अंगावर केस असतात हे चूक आहे.
फुलांमध्ये दडला होता 5 फूट लांब कोब्रा; बेडकाचा आवाज आला आणि...
नागाच्या डोक्यावर मणी असतो ?
नागच्या डोक्यावर नागमणी असतो ही बिनबुडाची समजूत आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही. हे सत्य असते तर गारूडी गरीब राहिलेच नसते. हरणटोळ जातीचा साप म्हणे टाळू फोडतो, अशीही समजूत आहे. हा साप अतिशय नाजूक आहे. त्याचे डोके तोंड रबराप्रमाणे मऊ असते.
माणसाच्या कवटीचे हाड अत्यंत कठीण असते. डोक्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांना छन्नी हातोडी वापरावी लागते. या जातीचे साप शक्यतो झाडावर असतात आणि या सापांना चावण्यास माणसाचे डोके जवळ पडते. त्यामुळे हा गैरसमज पसरला आहे.
साप बदला घेतो ?
सापाचा मेंदू विकसित झालेला नाही. त्यामुळे साप डूख धरतो, बदला घेतो ही गोष्ट अशास्त्रीय आहे. भूक लागल्यानंतर भक्ष्य पकडणे, तहान लागल्यावर पाणी पिणे आणि झोपा काढणे या पलिकडे साप विचार करु शकत नाही. त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती लक्षात ठेवू शकत नाही. साप डुख धरत नाही. तो बदला घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी महत्त्वाची माहिती कदम यांनी दिली.
लग्नाळूंसाठी श्रावण ठरेल लकी; शंकराची पूजा करताना हा मंत्र नक्की म्हणा…
मांडूळ सापाची तस्करी का करतात?
जमिनीखाली आढळणारा अत्यंत शांत स्वभावाचा हा साप. शेपटीकडील बाजू ही तोंडासारखी आकाराने असते. त्यामुळे या सापाला 'दुतोंड्या' असेही म्हटले जाते. हल्ली यामांत्रिक-तांत्रिक लोकांकडून या सापांना पकडून मंत्रविधी केल्याने पैशाचा पाऊस पडतो. घरात ठेवल्याने धनलाभ होतो, तर बुटक्या माणसाची उंची वाढते. कॅन्सरवर रामबाण इलाज या अशा अफवामुळे हा साप बदनाम झाला आहे.
साप चावल्यास मिरची किंवा कडुनिंबाचा पाला खायला दिल्यास तो गोड लागतो, याला शास्त्रीय कारण आहे. विषारी साप चावल्यावर माणसाच्या संवेदना कमी झालेल्या असतात. त्यामुळे त्याला चव कळत नाही. आपल्या अशा अनेक अंधश्रद्धा आणि मुर्खपणामुळे सापाच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत. या वर्षी नागपंचमीच्या दिवशी फक्त त्याची पूजा करण्याऐवजी सापांना समजावून घेऊ या. मनातील अंधश्रद्धा दूर करुया, असं आवाहन देखील कदम यांनी केलं.