या सुंदर नखांमागे नेल एक्स्टेन्शन आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नेल एक्स्टेन्शन म्हणजे काय? ते कसे करतात? त्यामुळे तुमची नखं कशी सुंदर दिसतात. याविषयीची संपूर्ण माहिती पुण्यातल्या प्रसिद्ध नेल्स आर्टिस्ट सोनल भोमे यांनी दिली आहे.
पिंपल्समुळे चेहरा दाखवण्याची लाज वाटतेय? ‘या’ घरगुती उपायानं होईल सुटका
नेस एक्स्टेन्शन म्हणजे काय?
advertisement
‘तुमच्या आहे त्या नखावर आर्टिफिशियल नख लावणे म्हणजे नेल एक्स्टेन्शन. ते तुमचचं नख वाटावं या पद्धतीनं ते लावलं जातं. तुमची नखं लांब असो किंवा आखूड तुम्हाला हवा तो आकार तुम्हाला यामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर तुमच्या नखांना याचा त्रासही होत नाही', अशी माहिती भोमे यांनी दिली.
किती आहेत प्रकार
जेल नेल एक्स्टेन्शन : हा सध्या सगळीकडे प्रचलित असलेला प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला खोटी नखं लावली जात नाहीत तर जेलच्या मदतीनं नखं तयार केली जातात.
अॅक्रेलिक नेल एक्स्टेन्शन : हा आपल्या देशामधील सर्वात प्रचलित प्रकार आहे. अॅक्रेलिक मटेरिअलची तयार नखं बाजारात मिळतात. त्यालाच अॅक्रेलिक नेल एक्स्टेन्शन असं म्हंटलं जातं.
फायबरग्लास नेल एस्टेन्शन : हा नेल एक्स्टेन्शनचा थोडा वेगळा प्रकार आहे. यामध्ये नखांचा तयार आकार मिळत नाही. तर, तुम्हाला पातळ तारांच्या स्वरुपात नेल एक्स्टेन्शन मिळते.
Video: मेकअप आर्टिस्ट व्हायचंय? जाणून घ्या खास कोर्स आणि टिप्स
खोटी नखं तुमची खरी नखं खराब तर करतात?
नेल एक्स्टेन्शन हे तुमच्या नखाचे सौंदर्य वाढवते. हे लावण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स जास्त वापरले तर त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे कुठेही हे प्रयोग करू नका. योग्य पार्लर किंवा क्लिनिकमध्ये नेल एक्स्टेन्शन केले तर तुमची नखं खराब होणार नाहीत. तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याचे आधीच कल्पना द्या, असा सल्ला सोनल यांनी दिला.
नखांवर प्रयोग करताना तुमची नखं मजबूत आहेत की नाही हे देखील पाहा. तुमची नखं चांगली असतील तर तुमच्या नेल इनॅमलला लगेचच त्रास होणार नाही. तुम्ही चुकीचे प्रयोग केले तर मात्र तुमच्या नखांना याचा त्रास होऊ शकतो. नेल आर्ट करण्यापूर्वी तेथील पॉडक्ट्स तपासून पाहा, अशी सूचनाही सोनल यांनी केली आहे.