TRENDING:

Pimpri Chinchwad: 19 लाख वाहने अन् प्रदूषित नद्या, पिंपरी चिंचवडला प्रदूषणाचा विळखा, धक्कादायक अहवाल समोर

Last Updated:

Pimpri Chinchwad: स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावत पिंपरी-चिंचवड शहराने एक अभिमानाची कामगिरी केली. पण आता प्रदुषणाबाबत एक धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावत पिंपरी-चिंचवड शहराने एक अभिमानाची कामगिरी केली आहे. मात्र दुसरीकडे, वाढती वाहने, उद्योगांची भरभराट आणि बदललेली जीवनशैली यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच ध्वनी प्रदूषणातही वाढ झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.
पिंपरी चिंचवडला प्रदूषणाचा विळखा
पिंपरी चिंचवडला प्रदूषणाचा विळखा
advertisement

पिंपरी-चिंचवड शहराचा पर्यावरण अहवाल जाहीर

पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणाची सध्याची स्थिती काय आहे, याचा अभ्यास करणारा 2024-25 चा पर्यावरण अहवाल महापालिकेने मंगळवारी जाहीर केला. या अहवालात शहराच्या विकासासोबत पर्यावरणावर काय परिणाम होतोय, यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालात लोकसंख्या, हवामानातील बदल, पावसाचं प्रमाण, पाणीपुरवठा, नदी-नाले-तलावांची अवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, हवेतील आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी, जमिनीची गुणवत्ता, कचऱ्याचं व्यवस्थापन, ऊर्जा वापर, वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती, स्मार्ट सिटी प्रकल्प, शिक्षण, आरोग्य सेवा, उद्याने, उद्योग, आपत्ती व्यवस्थापन आणि शहर नूतनीकरणासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

advertisement

पुण्यात तब्बल दोन वर्षापासून वीज चोरी, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने करायचे चोरी, MSEB ने ठोठावला 19 लाखांचा दंड

View More

शहरात 19 लाखांहून अधिक वाहने

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या सुमारे 25 लाखांच्या आसपास आहे, तर येथे नोंदणीकृत वाहनांची संख्या आता 19 लाख 8 हजार 550 इतकी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत वाहनांच्या नोंदणीत 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरात ई-वाहनांचं प्रमाणही हळूहळू वाढतंय. सध्या एकूण वाहनांपैकी सुमारे साडेतीन टक्के वाहने ही इलेक्ट्रिक प्रकारातील आहेत. त्यामध्ये 50 हजार 902 ई-वाहनांची नोंद झाली आहे.

advertisement

ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली

पिंपरी-चिंचवड शहरातील काही प्रमुख भागांमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. तळवडे, भोसरी एमआयडीसीसारख्या औद्योगिक पट्ट्यांपासून ते पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागर, मॉल, भाजी मंडई आणि मेट्रो परिसरात आवाजाची पातळी विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचं महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून स्पष्ट झालं आहे.

पवना नदी सर्वाधिक प्रदूषित; नाल्याचं सांडपाणी थेट नदीत

advertisement

पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यातून वाहणारी पवना नदी सध्या सर्वाधिक प्रदूषित नदी ठरत आहे. 24.4 किलोमीटर लांब अंतर शहरातून वाहणाऱ्या या नदीत नाल्याचं सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडलं जातं, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सतत खालावत चालली आहे. शहराच्या उत्तर भागातून वाहणारी इंद्रायणी नदी (20.6 किमी) दुसऱ्या क्रमांकाने प्रदूषित असून, औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे तिच्यावर विपरीत परिणाम होत आहे, असं पर्यावरण अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर शहराच्या दक्षिणेकडून वाहणारी मुळा नदी (12.4 किमी) देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत चाललेलं प्रदूषण थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचं या अहवालातून स्पष्ट होतं आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Chinchwad: 19 लाख वाहने अन् प्रदूषित नद्या, पिंपरी चिंचवडला प्रदूषणाचा विळखा, धक्कादायक अहवाल समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल