advertisement

Pune News: पुणेकरांचा 'वेग' होणार कमी! 'या' 3 प्रमुख रस्त्यांवर महापालिका करणार मोठे बदल

Last Updated:

स्पर्धा संपल्यानंतर गणेशखिंड रस्ता, पाषाण रस्ता आणि सेनापती बापट रस्ता यांसारख्या मार्गांवर वाहने अतिवेगाने धावत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले होते.

पुण्यातील रस्त्यांवर आता पुन्हा एकदा 'ब्रेक'
पुण्यातील रस्त्यांवर आता पुन्हा एकदा 'ब्रेक'
पुणे: 'पुणे ग्रॅण्ड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी चकाचक करण्यात आलेल्या पुण्यातील रस्त्यांवर आता पुन्हा एकदा 'ब्रेक' लागणार आहे. स्पर्धेसाठी शहरातील ज्या प्रमुख रस्त्यांवरील गतिरोधक काढण्यात आले होते, ते आता पुन्हा बसवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. यामुळे सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या वेगाला लगाम बसणार असून पादचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.
सुसाट वाहनांमुळे पादचारी धास्तावले
आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी पुणे महापालिकेने आपल्या हद्दीतील ७५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची विशेष दुरुस्ती केली होती. सायकलस्वारांना अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांवरील चेंबर समपातळीवर आणले गेले आणि सर्व गतिरोधक काढून रस्ते गुळगुळीत करण्यात आले. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर गणेशखिंड रस्ता, पाषाण रस्ता आणि सेनापती बापट रस्ता यांसारख्या मार्गांवर वाहने अतिवेगाने धावत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले होते.
advertisement
शास्त्रीय पद्धतीने होणार उभारणी
नागरिकांच्या वाढत्या मागणीची दखल घेत पथ विभागाने पुन्हा गतिरोधक बसवण्याचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, हे गतिरोधक जुन्या पद्धतीचे नसून ते IRC मानकांनुसार शास्त्रीय पद्धतीने तयार केले जातील. यामुळे वाहनांचे नुकसान टाळले जाईल आणि वेगावरही नियंत्रण राहील.
advertisement
"सायकल स्पर्धेसाठी काढलेले गतिरोधक पुन्हा बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिथे अत्यंत आवश्यकता आहे, तिथे शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक उभारले जातील, जेणेकरून अपघात टाळता येतील." — अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांचा 'वेग' होणार कमी! 'या' 3 प्रमुख रस्त्यांवर महापालिका करणार मोठे बदल
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement