advertisement

रंगकाम करताना उडाला आयुष्याचा रंग; पुण्यात कामगाराचा भयानक शेवट, मन सुन्न करणारी घटना

Last Updated:

पुण्यातील तळजाई परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका इमारतीला रंगकाम करत असताना ृतोल गेल्याने ४९ वर्षीय कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाला.

रंगकाम करताना पडून मृत्यू (AI Image)
रंगकाम करताना पडून मृत्यू (AI Image)
पुणे : पुण्यातील तळजाई परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका इमारतीला रंगकाम करत असताना लाकडी पाळण्यावरून तोल गेल्याने ४९ वर्षीय कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाला. सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवल्याने ही जीवघेणी दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवत, पोलिसांनी निष्काळजी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
अशोक दशरथ डेंगळे (वय ४९, रा. टिळकनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी (३० जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास अशोक डेंगळे तळजाई परिसरातील गायत्री सोसायटीमध्ये इमारतीला रंग लावण्याचे काम करत होते. उंचावर काम करण्यासाठी त्यांनी लाकडी पाळण्याचा आधार घेतला होता. मात्र, रंगकाम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट जमिनीवर कोसळले.
advertisement
ठेकेदाराचा निष्काळजीपणा नडला
या भीषण पडझडीत अशोक डेंगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी अशोक यांचा मुलगा अमर डेंगळे (वय २३) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. "वडिलांना कामाच्या ठिकाणी हेल्मेट, सुरक्षा पट्टा किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने ठेकेदाराने दिली नव्हती, त्यामुळेच त्यांचा बळी गेला," असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
advertisement
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
रंगकाम करताना उडाला आयुष्याचा रंग; पुण्यात कामगाराचा भयानक शेवट, मन सुन्न करणारी घटना
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement