Pune Police Bharti: पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! शहरात लवकरच मोठी पोलीस भरती; 'या' तारखेपासून प्रक्रियेला सुरूवात
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आता हालचाली वेगवान झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे
पुणे: पुणे शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आता हालचाली वेगवान झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची संभाव्य तारीखही समोर आली आहे.
मनुष्यबळाचा मोठा तुटवडा
पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता, पोलीस दलात किमान २० ते २१ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ १० हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. निम्म्या मनुष्यबळावर कामाचा ताण असल्याने पोलिसांना अनेकदा २४-२४ तास 'ऑन ड्युटी' राहावे लागते. याचा थेट परिणाम पोलिसांच्या मानसिक आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावर होत आहे. गेल्या वर्षी शहरात पाच नवीन पोलीस ठाणी सुरू झाल्याने या मनुष्यबळाची चणचण अधिकच भासत आहे.
advertisement
फेब्रुवारीत मैदानी चाचणीचे संकेत
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी अंदाजे १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. या शारीरिक चाचणीसाठी राज्यभरातून हजारो तरुण पुण्यात येण्याची शक्यता असून, पोलीस प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली आहे.
advertisement
का महत्त्वाची आहे ही भरती?
कामाचा ताण कमी होईल: नवीन भरतीमुळे सध्याच्या पोलिसांना साप्ताहिक सुट्ट्या आणि कामाचे निश्चित तास मिळण्यास मदत होईल.
गुन्हेगारीवर वचक: नवीन पोलीस ठाण्यांमध्ये पुरेसे संख्याबळ मिळाल्यास गस्त आणि तपासाला वेग येईल.
तरुणांना संधी: खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 9:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Police Bharti: पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! शहरात लवकरच मोठी पोलीस भरती; 'या' तारखेपासून प्रक्रियेला सुरूवात










