पुण्यात कशी असेल आरक्षण सोडत?
महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली असून यात 83 जागा महिलांसाठी तर 82 जागा पुरुषांसाठी आहे तर महिलांच्या 83 जागामध्ये महिला खुला प्रवर्ग 48, ओबीसी महिला 23,एसी महिला 11, एसटी महिला 1 अश्या तर पुरुष मध्ये सर्वसाधारण 48,ओबीसी सर्वसाधारण 22,एस सी पुरुष 11, एस टी पुरुष 1 अस जाहीर करण्यात आलं आहे.
advertisement
पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट
पुणे महापालिका सोडतीची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची रंगीत तालीम आज सोमवारी 10 नोव्हेंबरला घेण्यात आली होती. त्यानंतर लगेचच 17 नोव्हेंबरला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केलं जाणार असून त्यावरील हरकती सूचना सादर करण्यास आठवडाभराचा कालावधी देण्यात आला आहे. सोडतीनंतर खऱ्या अर्थाने पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे.
41 प्रभागांतून 165 नगरसेवक
अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाली असून आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिकेच्या 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील 40 प्रभाग 4 सदस्यीय असून प्रभाग 38 हा 5 सदस्यांचा आहे. या प्रभागांसाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षित प्रभाग झाले आहेत.
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग - प्रभाग क्रमांक १ अ, प्रभाग क्रमांक १२ अ, प्रभाग क्रमांक ७ अ, प्रभाग क्रमांक ३२ अ, प्रभाग क्रमांक २८ अ, प्रभाग १४ अ, प्रभाग क्रमांक ४१ अ, प्रभाग क्रमांक १५ अ, प्रभाग क्रमांक ३९ अ, प्रभाग क्रमांक २२ अ, प्रभाग क्रमांक २ अ
अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग - ४ अ, ६ अ, ८ अ, १३ अ, १७ अ, २१ अ, २३ अ, २६ अ, २७ अ, ३६ अ, ४० अ
अनुसूचित जमाती महिला - ९अ, अन्य - १ ब
नागरिकांचा मागासवर्ग महिला - ३ अ, २५ अ, ३८ अ
दरम्यान, 17 नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूपावर 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती आणि सूचना सादर करता येतील. 24 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. हरकती महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा प्रभाग कार्यालयात लेखी स्वरूपातच स्वीकारल्या जातील. ऑनलाइन किंवा ई-मेलद्वारे पाठविलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत प्रसिद्ध केली जाईल.
