सप्टेंबर महिन्यात पीएमपीने या बसेसची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली होती. हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर यांसारख्या वर्दळीच्या भागांत १० दिवस ही चाचणी चालली. या बसेसची बॅटरी क्षमता आणि रस्त्यांवरील उपयुक्तता तपासण्यासाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने दिलेल्या सकारात्मक अहवालानंतर आता २५ बसेस भाडेतत्त्वावर घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
advertisement
प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा:
पूर्णतः वातानुकूलित (AC): कडक उन्हातही प्रवाशांना थंडगार प्रवास करता येईल.
प्रदूषणमुक्त: इलेक्ट्रिक असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही.
जास्त आसन क्षमता: एकाच वेळी जास्त प्रवाशांची वाहतूक शक्य होईल, ज्यामुळे गर्दीच्या वेळी दिलासा मिळेल.
कोणत्या मार्गांवर धावणार?
प्राथमिक नियोजनानुसार, आयटी हब आणि मेट्रो कनेक्टेड मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. यात हिंजवडी फेज-३ ते फेज-३ वर्तुळ, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ आणि देहू ते आळंदी (भक्ती-शक्ती मार्ग) याचा समावेश आहे
नवीन वर्षात या बसेस सुरू झाल्यावर विशेषतः आयटी कर्मचारी आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
