नवी मुंबई : ऐरोली सिग्नलवर मिक्सर ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर ट्रक चालकाच्या अपहरणाला धक्कादायक वळण लागले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकाची सुटका पुण्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरून केली आहे.
तुर्भे एमआयडीसीतील रहिवासी प्रल्हाद कुमार हा मिक्सर ट्रक घेऊन जात असताना त्याच्या ट्रकने कार क्रमांक MH 12 RT 5000 ला धडक दिली. या धडकेनंतर कारमधील दोघांनी प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने आपल्या वाहनात बसवून नेले. घटनेनंतर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात यांनी तपास करत कारचा मागोवा घेतला असता ती पुण्यातील चतुश्रृंगी हद्दीतील पूजा खेडकर यांच्या घरी आढळली. येथून पोलिसांनी अपहरण झालेल्या चालकाची सुटका केली.
advertisement
पुजा खेडकरच्या आईचा अरेरावीपणा
दरम्यान, कारवाईदरम्यान पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवीपणा करत दरवाजा उघडण्यास नकार दिला. नेमकी गाडी चालक कोण चालवत होतं व अधिकचा तपास करण्यासाठी रबाळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हा दाखल करण्याची शक्यता
अपहरण झालेली व्यक्ती बिहारची होती, तो एका ट्रकवर हेल्पर म्हणून काम करत होता. ड्रायव्हरला उचलून घरात आणण्याची हिंमत होत असेल तर यांच्यामध्ये गुन्हेगारी किती नसानसात भिनली आहे, हे पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतून अपहरण करायचे घरात डांबून ठेवायचे , पोलिसांनी देखील विरोध करायचा या प्रकरणी आता पोलीस शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
खेडकर कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे?
या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला? अपघातात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात कशी आली? अपघातातील दोघे आरोपी कोण होते आणि त्यांचा खेडकर कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे? या सर्व बाबींची चौकशी नवी मुंबई पोलीस करत आहे.
पूजा खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ
पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर याआधीही विविध वादग्रस्त प्रकरणांचे आरोप लागले आहेत. त्यामुळे या नव्या अपहरण प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत अधिक भर पडल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा: