TRENDING:

'सार्वजनिक शांतता भंग करू नका'; पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; काय आहे कारण?

Last Updated:

Pune Police : पुणे पोलीस अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. पुणे ग्रामीण भागात 18 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. काय आहे कारण?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :पुण्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दुष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री12.05 वाजल्यापासून ते 18 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37  (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
News18
News18
advertisement

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

advertisement

सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 19651चे कलम 37 (1) व (3) विरुद्ध वर्तन करणे, कलम 37 चे पोट कलम (3) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.

advertisement

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
'सार्वजनिक शांतता भंग करू नका'; पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; काय आहे कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल