पुणे : आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा झपाट्याने हास होत आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढलेला आहे. यामुळे अलीकडच्या काळात वन्यजीव व मानवी संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. जुन्नरमध्ये मागील 25 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 54 लोकांचा बळी तर 150 हून अधिक जण जखमी झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील वन्यजीव संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.
advertisement
जुन्नर वन विभागात 2001 पासून मानव बिबट संघर्ष सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. मागील पंचवीस वर्षात जुन्नर वनविभागाच्या परिक्षेत्रात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात 54 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जण जखमी झाले आहे. 25 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 26 हजार 740 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. बिबट समस्या निराकारणात केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे.
बिबट्याच्या बाबतीतील इतर काही महत्वाची आकडेवारी
- माणिकडोह बिबट निवारा केंद्राकडून सन 2020 ते 2025 दरम्यान ऊस तोडताना किंवा इतर कारणाने आढळून आलेले 285 बिबट बछड्यांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन केलेले आहे.
- गेल्या पंचवीस वर्षात रेस्क्यू टीमने 238 बिबट्यांना जीवदान दिलेले आहे.
- सन 2018 ते 2025 दरम्यान 133 बिबट्याचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
- सन 2018 ते 2025 दरम्यान 150 बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
पंचवीस वर्षात बिबट्याच्या बदललेल्या सवयी
शेतात लपून छापून वास्तव्य करणारे बिबटे आता भटक्या कुत्र्यांप्रमाणे फिरताना दिसत आहेत. पशुधनाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी गोठे बंदिस्त केल्याने अन्न पाण्याच्या शोधात बिबटे थेट मानव वस्तीत दिसू लागले आहेत. एकटे दिसणारे बिबटे आता दोन ते तीन च्या झुंडीने मानव वस्तीत दिसू लागले आहेत. पूर्वी फक्त रात्री फिरणारे किंवा दिसणारे बिबटे आता सर्रास दिवसा निदर्शनास येत आहेत.
बिबट्यांचे नियंत्रण हाताबाहेर
सध्या वाढत असल्याने बिबट्यांचे नियंत्रण हाताबाहेर जात असल्याचे वास्तव आहे. ज्या बिबट्याला बघायला मनुष्य जंगल गाठतो, तो आता सहज मानवी वस्तीत आढळून येत आहे. बचाव दलाची गरज सध्या महाराष्ट्रात बिबट-मानव संघर्ष कमालीचा उभा झाला आहे. वन्यप्राणी बचाव दलाची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे