पुणे: नाटक हे थेअटरमध्ये जावून बघायला अनेकांना आवडतं. पण काही कारणांनी थेअटरपर्यंत जाणं शक्य होत नाही. अशांसाठी आता नाटकच घरात येत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही तर खरेखुरे कलाकारच आपल्या घरी येऊन नाटक सादर करणार आहेत. पुण्यातील गुफान संस्थेमार्फत हा अनोखा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमांतर्गत कलाकार घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये जाऊन 'बबड्या बोल' हे नाटक विनामुल्य सादर करतील.
advertisement
पुण्यातील लोणावळा, आंबेगाव, उत्तमनगर, सुखसागरनगर, सुस आदी ठिकाणी बालकलाकार आणि युवा कलाकार नाटक सादर करणार आहेत. प्रत्येकाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांच्या गुफान संस्थेकडून हा आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या सोसायट्या आणि घरांमध्ये अगदी विनामूल्य नाटक सादर केले जाणार आहे.
फक्त साडेतीन हजार खर्च करा, चोर आल्यास गावभर होईल बोंब, राक्षे बंधूंचं यंत्र पाहिलं का?
म्हणून विनामुल्य नाटक!
नेट, मोबाईल, व्हिडिओ गेम्सच्या आजच्या गतिमान युगात मुलं आपल्या कुटुंबा पासून अलिप्त एकटे होत आहेत, प्रसंगी अतिरेकी सुद्धा होत आहेत. पालक आपल्या कामानिमित्त सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत गुंतलेले असतात, अशा वेळेला मुलांचा पालक, मालक आणि नियंत्रक हा त्यांचा मोबाईल, व्हिडिओ गेम होताना दिसत आहे. त्यामूळे हे होऊ नये आणि मुलांना नाटकाची गोडी निर्माण व्हावी यां हेतूने हे नाटक सादर करण्यात येतं असल्याचं यावेळी जेष्ठ रंगकर्मी देवदत्त पाठक यांनी सांगितलं.
रक्षांबधनाच्या औचित्यावर पुण्यात एक अनोखा उपक्रम, तुम्हीही कराल कौतुक, VIDEO
सण-उत्सवाला नाटक पाहण्याची संधी
आपल्याला हे नाटक जो संदेश देते तो नुसतं मनोरंजन म्हणून घेऊ नये. तर तो आपल्या थेट घरात घेऊन जायला हरकत नाही, असा या नाटकाचा आश्वासक अनुभव आहे. त्यामुळे गुरुस्कूल गुफांनच्या या नाट्यप्रयोगासाठी अनेकांचे सहकार्य लाभतेय. मुलांच्या अति प्रश्नांमुळे त्रस्त होण्यापेक्षा मुलांच्या प्रश्नांची घरामध्येच वर्ग शाळा भरवा, नाहीतर कायमचे अश्रू येतील. हे टाळण्यासाठी हे नाटक पाहणं महत्वाचं आहे. येणाऱ्या काळात अनेक सण-उत्सव देखील साजरे करण्यात येणार आहे. त्या प्रसंगी तुम्ही देखील गुफानच्या टीमला घरी बोलवून विनामूल्य हा प्रयोग आपल्या घरात राबवू शकता, असं आवाहनही पाठक यांनी केलंय.