या मदत कक्षात रेल्वेचे दोन अधिकारी २४ तास तैनात आहेत. ज्यांची विमाने रद्द झाली आहेत अशा प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक आणि आरक्षणाबाबत तत्काळ माहिती दिली जात आहे. तसेच, वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागाने बेंगळुरू, हैदराबाद आणि हिसार या शहरांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.
इंडिगो विमानसेवा विस्कळतेमुळे रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतून धावणार विशेष गाड्या, चेक करा वेळापत्रक
advertisement
विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
१. पुणे-बेंगळुरू स्पेशल (०६२६४): ही गाडी ८ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि सोलापूर, वाडी, गुंटकलमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता बेंगळुरू पोहोचेल.
२. हडपसर-हैदराबाद स्पेशल (०७१६८): ही गाडी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता सुटून छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सिकंदराबादमार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी ४:४५ वाजता हैदराबादला पोहोचेल.
३. खडकी-हिसार स्पेशल (०४७२६): ही गाडी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०:२५ वाजता हिसारला पोहोचेल.
विमानतळ परिसरातील हॉटेल्सनी देखील दरात वाढ केल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी रेल्वेच्या या तत्पर निर्णयामुळे प्रवाशांना केवळ आर्थिक दिलासाच मिळाला नाही, तर त्यांच्या प्रवासाचा खोळंबाही टळला आहे.
