पुणे : गणेशोत्सवाची धामधूम पुण्यातील सगळीकडे पाहायला मिळत आहे. धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेले देखावे हे बघायला मिळतात. यावर्षी पुण्यातील एका मंडळाने प्राचीन शिवमंदिराचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी याठिकाणी करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या अमृतवेल मित्र मंडळाने यंदा प्राचीन शिवकालीन मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारलाय. प्राचीन शिवमंदिर मंदिरं ही शिल्पजडित असतात. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली असायची तसेच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आढळून यायचा आणि याचं पद्धतीची प्रतिकृती अमृतवेल मित्र मंडळाने साकारली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर : भारतातील सर्वात लहान गणेशाची मूर्ती पाहिली का?, काय आहे यात स्पेशल, VIDEO
अमृतवेल मित्र मंडळाचे हे 14 व वर्ष असून गेल्या अनेक वर्षापासून ते वेगवेगळे प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न करतात. तरुण मंडळातील सर्व सदस्य एकत्र येऊन दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करत असतात. त्याच पद्धतीने मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. या उत्सवाच्या काळात आपले उत्सव साजरे करतांना संस्कृती जपली जावी अशी यामागील भावना असल्याचे मंडळाचे खजिनदार ऋषिकेश नखाते यांनी दिली आहे. तसेच यावेळी महिलांसाठी देखील मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे, असं देखील सांगण्यात आलं.
शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती : साताऱ्यातील ही अनोखी परंपरा नेमकी काय?, VIDEO
या ठिकाणच्या मंडपात जातानाच समोर नदीचे दर्शन होते, कृत्रिम तलावात विराजमान असलेल्या नदीच्या अंगावरती पाण्याच्या धारा पडल्याने नंदीराजाला जलाभिषेक होत असल्याचा भास होतो. पुढं भगवान शंकराच्या समोर विराजमान झालेली गणरायांची सुंदर मूर्ती, पाहून साक्षात आपले पुत्र गणपती बाप्पाच्या पाठीशी भगवान शंकर उभे असल्याचे निदर्शनात येते. हा सुबक देखावा पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडकर गर्दी करू लागलेत.