छत्रपती संभाजीनगर : भारतातील सर्वात लहान गणेशाची मूर्ती पाहिली का?, काय आहे यात स्पेशल, VIDEO

Last Updated:

ही मूर्ती भारतातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा केला गेला आहे. ही मूर्ती गजेंद्र वाढोणकर यांनी साकारली आहे. तसेच या मूर्तीची नोंद ही वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे.

+
तांदळावरचा

तांदळावरचा लहान गणपती

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : जगभरात भारतामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक मंडळामध्ये देखील बाप्पाची स्थापना झालेली आहे. आपण किती मोठा गणपती मांडू शकतो आणि कसे छान डेकोरेशन करू शकतो, अशी अनेक मंडळांमध्ये स्पर्धा असते. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील एका मंडळाने अगदी छोटा तांदुळावर गणपती बाप्पाची मूर्ती रेखाटली आहे.
advertisement
Nashik News : गणेश विसर्जनाच्या दिवशी हे 12 मार्ग राहतील बंद, नाशिकच्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती
छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर 11 याठिकाणी सुदर्शननगर श्री कालभैरव प्रतिष्ठान या मंडळाने गणपती बाप्पाची सर्वात छोटी मूर्ती स्थापन केली आहे. या मंडळांनी यावर्षी तांदुळाच्या एका दाण्यावर गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे आणि ही मूर्ती भारतातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा केला गेला आहे. ही मूर्ती गजेंद्र वाढोणकर यांनी साकारली आहे. तसेच या मूर्तीची नोंद ही वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. याचे प्रमाणपत्रही या मंडळाला मिळाले आहे.
advertisement
ही गणपतीची मूर्ती एका तांदळाच्या दाण्यावरती साकारण्यात आली आहे. अतिशय सूक्ष्म ही मूर्ती आहे. ही मूर्ती बघण्यासाठी तुम्हाला भिंगाचा वापर करुन ही मूर्ती बघावी लागतो. जो तांदुळाचा दाणा आहे, त्याचा आकार हा 8 एमएम इतका आहे. ही मूर्ती काढण्यासाठी 2.44 सेकंद एवढा कालावधी ही मूर्ती काढण्यासाठी लागला. यावर साकारलेली मूर्ती ओझरच्या विघ्नेश्वराची आहे. या मूर्तीची रुंदी जी आहे, ती 1.5 एमएम इतकी आहे. अतिशय सुंदर आणि सूक्ष्म मूर्ती ही तयार करण्यात आलेली आहे.
advertisement
तुम्हालाही ही मूर्ती पाहायची असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या एन11 येथील सुदर्शन नगर येथील श्री कालभैरव प्रतिष्ठान या ठिकाणी जाऊन या मूर्तीचे दर्शन करू शकतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छत्रपती संभाजीनगर : भारतातील सर्वात लहान गणेशाची मूर्ती पाहिली का?, काय आहे यात स्पेशल, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement