आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या
काही दिवसांपूर्वी 19 वर्षीय आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या गेल्या वर्षी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी केल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये आयुषचे वडील गणेश कोमकर हे आरोपी आहेत. आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी या हत्येमागे आयुषचे आजोबा आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा हात असल्याचा आरोप केला होता.
advertisement
पोलिसांना गुजरातमधून टीप मिळाली अन्...
याच आरोपांनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस पथकाला ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुजरातमध्ये धडक देऊन शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या चार आरोपींना अटक केली.
कटात आणखी कोण कोण सामील?
दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीही काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील मूळ आरोपी आणि कटात सामील असलेल्या इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत. या हत्येमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा मुद्दा चर्चेत आला आहे.