पुणे : सर्वच क्षेत्रात महिला यशस्वी आणि सर्वोत्तम कामगिरी करीत आहेत, अर्थातच उद्योग क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. ग्रामीण भाग असो नाहीतर शहरी भाग महिला उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत. यामध्ये यशस्वी होत आहेत. अशीच कहाणी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुढे आलेल्या उद्योजिका महिलेची आहे. पतीच्या दुःखद निधनानंतर पतीच्या स्वप्नांशीगाठ बांधत या महिलेने फुड्स गृह उद्योग सुरू केला असून तो यशस्वी करून दाखवला आहे.
advertisement
कशी झाली सुरुवात?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील या महिलेचे नाव राणी शिंदे आहे. राणी शिंदे याआधी चांदखेड गावात आशा स्वयंम सेविकेच काम करत होत्या. पण अचानक पणे त्यांच्या पतीच 2022 मध्ये दुःखद निधन झालं. त्यामुळे सर्व घरातील व्यक्तीची आर्थिक जबाबदारी ही त्याच्यावर आली. त्यानंतर श्रावणी या नावाने एक छोटासा फुड्स गृह उद्योग त्यांनी सुरु केला. दहा बाय दहाच शेड मारून पापडची मशीन घेतली आणि व्यवसाय सुरु केला.
मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा
हे सुरु करण्यामागच कारण एकचं होत की माझ्या नवऱ्याची इच्छा होती मी काही तरी व्यवसाय सुरु करावा. पतीच्या निधनानंतर मी दोन महिने यूट्यूब वरती व्यवसाया संदर्भातले व्हिडीओ बघत होते. महिला सक्षम कशा झाल्या, त्यांनी कुठला व्यवसाय कसा सुरु केला. घरगुती पद्धतीने कुरड्या बनवण्याची कला माझ्याकडे होती. त्यामुळे मी हा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला कोणाला लागेल अशा 50 ते 100 कुरड्या बनवून देत होते. परंतु याची मागणी वाढली, असं राणी शिंदे सांगतात.
उपवासाची मिसळ खावी तर आप्पाची, पुण्यात 55 वर्षांपासून फेमस आहे हे ठिकाण, Video
मग पापड बनवले पाहिजे यासाठी बचत गटाच्या माध्यमातून उचल घेऊन मशीन घेतली. हे करत असताना घरच्यांनी देखील मला सपोर्ट केला. शासकीय योजनेचा लाभ घेऊन युनिट सुरु केलं. या माध्यमातून चार ते पाच महिना रोजगार निर्मिती देखील करून दिली. यामधून महिन्याकाठी 1 ते दीड लाखा पर्यंत उत्पन्न मिळत आहे. यामध्ये कुरडई, पापड, शेवई, सांडगे, मसाला कुटणे अशा सर्व पदार्थ बनवण्याच काम केलं जात, असंही राणी शिंदे यांनी सांगितलं.