जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
गुंड गजा मारणे याला न्यायालयाचा दणका दिला आहे. गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्या प्रकरणी गजा मारणेवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळत या प्रकरणात गजा मारणेसह दहा साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाने गुन्हे शाखेला तीस दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण न्यायालयाने गजा मारणे याचा हा अर्ज फेटाळला असून गजा मारणेचा मुक्काम पुन्हा जेलमध्येच असणार आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय होतं?
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर देवेंद्र जोग या तरुणाला 19 फेब्रुवारी रोजी मारहाण झाली होती. हा तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. जोग याला मारहाण झाल्यावर मंत्री मोहोळ यांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं आणि कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर या मारहाण प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये गजा मारणे याला देखील अटक करण्यात आली होती.
मटण पार्टी भोवली
मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश दिला अमितेश कुमार यांनी आहे. मात्र, या पोलिसांचं निलंबन कायमस्वरुपी करावं अशी मागणी देखील करण्यात येत आहे.