आत्महत्या की हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह गुरुवारी दुपारी कॅम्पसमध्ये आढळून आला. सुभाष कामठे हे मूळचे पुण्यातीलच फुरसुंगी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ही आत्महत्या आहे की हत्या? असा सवाल विचारला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष कामठे हे शेतकरी असून कुटुंबासोबत फुरसुंगी परिसरात राहतात. कामठे हे मागील आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झाले आहेत. अशी तक्रार कामठे यांच्या नातेवाईकांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मच्छीमारांना एमआयटी कॉलेजच्या परिसारातील मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावर सापडला.
एमआयटी कॉलेजच्या परिसरात खळबळ
दरम्यान, सुभाष कामठेच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात भरपूर पाऊस झाल्याने एमआयटी कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. तर मुळामुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने मृतहेद वाहून आल्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे आता पोलिसांना तपास करताना मोठी अडचण येण्याची शक्यता आहे.