गेल्या 4 ते 5 दिवसांपासून....
आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी कोठडीमध्ये आपल्याला त्रास दिला असून, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आंघोळ किंवा ब्रश करू दिला नसल्याची तक्रार आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी कोर्टासमोर केली.
advertisement
बंडूचा प्लॅन फसला
बंडू आंदेकरला कायद्याचं चांगलं नॉलेज आहे, असं गुन्हेगारी विश्वात म्हटलं जातं. कोर्टात कोणता युक्तीवाद केल्यानं जामीन मिळू शकतो, याची कल्पना त्याला आहे. त्यामुळे बंडूने पोलिसांवर आरोप केला आहे. कोर्टाने पोलिसांना फटकारल्यास त्याला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता होती. मात्र, बंडूचा हा प्लॅन फसला. बंडू अनेकदा कोर्टातील युक्तीवादाच्या जोरावर जामीनावर बाहेर आला आहे.
कृष्णाला हजर व्हायला लाव नाहीतर....
दरम्यान, आयुष हा माझा नातू होता. मी त्याला का मारेन, आमचे कुटूंबिक वाद नक्की असतील पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या नातवाला मारेन, असं बंडू आंदेकरने कोर्टात म्हटलं होतं. यावेळी त्याने पोलिसांना कोर्टात खेचलं. कृष्णाला हजर व्हायला लाव नाहीतर त्याला गोळ्या घालू असं पोलिसांनी धमकी दिल्याचा दावा देखील बंडूने कोर्टात केला आहे.