संजिवनीने हिस्सा मागितला...
माझ्या मुलाच्या हत्या प्रकरणात सर्वांचा समावेश असतो हे मला माहिती आहे. माझी मोठी बहिण संजिवनी कोमकर, ती पण अण्णांसारखीच तापट आहे. ती पण तशीच रागीट आहे. संजिवनीने तिचा हिस्सा मागितला. तेव्हा कृष्णा आंदेकर जेलमध्ये होता. संजिवनीने हिस्सा मागितल्यावर अण्णा म्हणाले कृष्णा आल्यावर बघू. कृष्णा बाहेर आल्यावर अण्णांनी तिला बोलवलं नाही, ती अण्णांकडे गेली नाही, असा वाद होता. तो त्यांचा विषय होता. त्यानंतर तो विषय वाढतच गेला. हे माझ्या पोरावर आलंय, त्यामुळे मला बोलावं लागतंय, असं कल्याणी कोमकर म्हणाल्या.
advertisement
सोनाली आंदेकरला देखील अटक करा - कल्याणी कोमकर
मी सगळ्यांची नावं पोलिसांना दिली. कोणाला सुद्धा लहान मुलाची दया आली नाही. लक्ष्मी आंदेकर ती पण आज्जीच आहे ना... पण कुणाला काहीच वाटलं नाही का? वृंदावनी वाडेकर यांच्याच घरी सगळे असतात. सोनाली आंदेकरला देखील अटक करा. तिची मुलगी देखील माझ्याऐवढीच आहे. तिला देखील माझ्या वेदना कळायला हव्यात. तिला मामी असून देखील तिला कळकळ नाही आली, ऐवढी कठोर माणसं कशी असू शकतात, असं कल्याणी कोमकर म्हणाल्या.
दरम्यान, माझ्या मुलावर गोळीबार झाल्याचं ऐकताच मला धक्का बसला. आयुषचे नामकरण माझ्या वडिलांनी म्हणजेच बंडू आंदेकर यांनीच केले होते. लहान असताना त्यांनी आयुषचे खूप लाड केले, पण त्यालाच मारताना त्यांनी काहीच विचार का केला नसेल? त्यांना काळीज नाहीये का? असा सवाल आई कल्याणीने भरलेल्या डोळ्यांनी विचारला.