फसवणुकीची पद्धत: तक्रारदार डॉक्टर तरुणी औंधमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, आपण मुंबईतील एका नामांकित खासगी बँकेतून बोलत असल्याचे भासवले. "तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा कार्ड बंद पडेल," अशी भीती चोरट्यांनी त्यांना घातली.
advertisement
लिंक पाठवून माहिती चोरली: चोरट्यांनी या तरुणीला विश्वास बसवण्यासाठी एक लिंक पाठविली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडलेल्या फॉर्ममध्ये बँकेची गोपनीय माहिती भरण्यास सांगितले. ही सर्व माहिती भरताच चोरट्यांनी त्या माहितीचा गैरवापर केला आणि क्षणात डॉक्टर तरुणीच्या खात्यातून २ लाख ९ हजार रुपये लांबविले. आपल्या खात्यातून रक्कम वळती झाल्याचे मेसेज येताच तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बँकेकडून असा कोणताही ओटीपी किंवा पासवर्ड विचारला जात नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.
