ती रात्र ठरली काळी! खड्ड्यानं घेतला पुण्याच्या दोन तरुणांचा जीव, कल्याण-अहिल्यानगर मार्गावर काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
ओतूर येथील कोळमाथा–नंदलाल लॉन्स परिसरात रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात मंगळवारी (२७ जानेवारी) पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. कल्याण-अहिल्यानगर राज्यमार्गावर कारचा भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरील खड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चार तरुण कारने कल्याणच्या दिशेने जात होते. ओतूर येथील कोळमाथा–नंदलाल लॉन्स परिसरात रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली कार प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या कवठाच्या झाडावर आदळली आणि त्यानंतर कठड्याला धडकून पलटी झाली.
या अपघातात वरद अमोल तांबे (२०, रा. ओतूर) आणि करण पवळे (२८, रा. पिरंगुट, पुणे) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य दोन जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवलं, मात्र दोघांना वाचवण्यात यश आलं नाही.
advertisement
प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका: या घटनेमुळे ओतूर परिसरात शोककळा पसरली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कोळमाथा परिसरातील रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला असून, वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती होत नसल्याने हे बळी गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मानवाधिकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत पा. डुंबरे यांनी इशारा दिला आहे की, जर तात्काळ रस्ता दुरुस्त केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 1:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
ती रात्र ठरली काळी! खड्ड्यानं घेतला पुण्याच्या दोन तरुणांचा जीव, कल्याण-अहिल्यानगर मार्गावर काय घडलं?










