मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी साहित्य
अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही हे मसाला शेंगदाणे बनवू शकता. मोठे शेंगदाणे, हळद, हिंग, धने, जिरे पावडर, तांदळाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, चाट मसाला, तेल, मीठ आदी साहित्य लागेल.
रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे, पण प्रमाण काय असावं? इथं चुकाल तर आरोग्याला मुकाल! Video
कुरकुरीत मसाले शेंगदाणे कृती
advertisement
सुरुवातीला 1 बाउल मोठे शेंगदाणे निवडून घ्यावेत. शेंगदाणे वापरण्यापूर्वी ते कोरडे असल्याची खात्री करून घ्यावी, त्यामुळे तळताना ते अधिक कुरकुरीत होतात. एका मोठ्या बाउलमध्ये शेंगदाणे घेऊन त्यात हळद, हिंग, धने-जिरे पावडर, तांदळाचे पीठ, बेसन आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करावे. तांदळाच्या पिठामुळे शेंगदाण्यांना छान कुरकुरीतपणा येतो, तर बेसनामुळे मसाला नीट चिकटतो. आता थोडे थोडे पाणी घालत शेंगदाणे व्यवस्थित कव्हर होतील, असे घट्ट मिश्रण तयार करावे.
गरज भासल्यास थोडे बेसन वाढवू शकता, मात्र कमीत कमी पाणी वापरणे महत्त्वाचे आहे. कढईत तेल चांगले तापल्यावर त्यात एक-एक शेंगदाणा सोडावा व मध्यम आचेवर साधारण 4–5 मिनिटे शेंगदाणे तळून घ्यावेत, जेणेकरून ते आतून पूर्ण शिजून बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत होतील. सर्व शेंगदाणे तळून झाल्यानंतर ते गरम असतानाच वरून थोडे मीठ व आवडीप्रमाणे चाट मसाला वरून मिसळावा. अशा प्रकारे चटपटीत मसाला शेंगदाणे खाण्यासाठी तयार होतात.





