नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, यासीन शेख आणि त्याचे मित्र त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शेकोटी करून थंडीचा आनंद घेत होते. यावेळी आरोपी ओंकार झोंबाडे तिथे आला आणि त्याने 'तू माझ्याकडे रागाने का पाहतोयस?' असा जाब विचारत वादाला सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर झोंबाडेने आपल्या इतर ८ साथीदारांना बोलावून घेतले. यानंतर लोखंडी गज आणि लाकडी दांडक्यांनी यासीनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात यासीन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
सावधान! तुमच्या बँक खात्यावर जोडीदाराची नजर तर नाही ना? पुण्यात पतीनेच पत्नीला लावला दीड कोटीचा चुना
पोलिसांनी ओंकार झोंबाडे, तुषार काकडे, दाद्या बगाडे, शश्या ऊर्फ रोहन पिंगळे, किशोर काकडे, दीपू शर्मा, देव शिरोळे, मोन्या कुचेकर आणि कैलास काकडे यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरात दहशत माजवणाऱ्या अशा टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
