बारमध्ये मद्यपान केलं अन्...
पुण्यातील सुभाषणगर येथील रहिवासी असलेले आशुतोष वैशंपायन 4 सप्टेंबर रोजी लखनऊहून पुणे स्टेशनवर आले होते. तिथे ते एका रिक्षातून सुभाषणगरकडे गेले, जिथे त्यांनी एका बारमध्ये मद्यपान केले आणि नंतर दुसरी रिक्षा पकडली. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. रिक्षाचालक सचिन जाधव याने वैशंपायन यांच्याकडे मोठी रोकड असल्याचे पाहिले आणि त्यांचा जीव घेण्याचा कट रचला.
advertisement
लोखंडी वस्तूने मारलं, गळा चिरून हत्या
11 सप्टेंबर रोजी जाधवने वैशंपायन यांना घोटवडे गावात नेलं. तिथं त्याने लोखंडी वस्तूने त्यांना मारले आणि नंतर गळा चिरून त्यांची हत्या केली. मृतदेह घोटवडे गावात टाकून तो पळून गेला. खून केल्यानंतर जाधवने वैशंपायन यांचे डेबिट कार्ड वापरून पुढील काही दिवसांत 4.45 लाख रुपये काढून घेतले. हे पैसे त्याने आपल्या मिनी-ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी वापरले.
कुजलेला मृतदेह आढळला
घोटवडे येथे 11 सप्टेंबर रोजी एका मध्यमवयीन व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ मिळालेल्या आधार कार्डाच्या मदतीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हा आधार कार्ड मुंबईतील पवई येथील पत्त्याचा होता, परंतु वैशंपायन यांचे कुटुंबीय पुण्यात होते. पुणे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालक जाधवचा माग काढला.
13 दरोड्याचे गुन्हे दाखल
दरम्यान, आरोपी जाधव हा धणकवडी येथील रहिवासी असून, त्याच्यावर यापूर्वीच 13 दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अनेक सापळे रचून अखेर रिक्षाचालक जाधवच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.