समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नीतिन साळवे आहे. आत्महत्येअगोदर पती- पत्नीमध्ये जोरदार वाद झाला आणि घराबाहेर पडत टोकाटे पाऊल उचलले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली असून नातेवाईक संतप्त झाले आहेत.
शेवटच्या कॉलमध्ये काय म्हणाले बहिणीला?
नितीन साळवे हे मुंबई येथील म्हाडा कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.पुण्याला त्यांचे कुटुंब राहत होते, ते फक्त शनिवार आणि रविवारी पुण्यात राहत असत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. नितीन साळवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या बहीण पूनम उमेश कांबळे यांना त्रास असह्य होतोय असे म्हटले होते. बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण यांना सोडू नको ताई असे म्हटले होते. त्यानंतर बहिणीने पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही प्रतिसाद दिला नाही. बहिणीने नितीनच्या पत्नी आणि मुलींवर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
बहिणीचे गंभीर आरोप
बहिण म्हणाली की, नितीनला त्याची पत्नी आणि दोन मुली सतत त्रास देत होत्या.ज्यावेळी नितीन घरी यायचा त्यावेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरात रोज भांडणं होत असे. नितीनच्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध होते. आत्महत्येच्या दिवशी मोठ्या मुलीने नितीनच्या छातीवर लाथ मारली आणि पत्नी तसेच दोन मुलींनीही अपमानास्पद वर्तन केले. त्यामुळेच नितीनने मला शेवटचा व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला आहे.दरम्यान या प्रकरणाबाबत मृत नितीन साळवे यांच्या पत्नीने कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
हे ही वाचा :
