स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झालाय. कृष्णा आंदेकर याच्यावर ज्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा तो मुलगा आहे. बंडू आंदेकर याच्याकडून पोलिसांनी थेट वॉर्निंग दिली होती. त्यानंतर आता कृष्णा सरेंडर झाला आहे.
advertisement
नाहीतर एन्काऊंटर करू
कृष्णराज आंदेकर हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. मात्र आज तो समर्थ पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला. कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याचं एन्काऊंटर करू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने न्यायालयात केला होता. मात्र, तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी आरोप फेटाळला. पोलिसांच्या या धमकीमुळे कृष्णाची तंतरली आणि त्याने सरेंडर केलं आहे.
सर्व 13 आरोपींना अटक
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व 13 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींमध्ये मुख्य आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.
अटकेतील आरोपींची नावे
बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाठोळे आणि सुजल मिरगू.