आंदेकरांच्या निशाण्यावर गायकवाड टोळीचे सदस्य
गोळीबार करून आयुष कोमकरचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अडिकार टोळीच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीच्या निशाण्यावर प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड टोळीचे सदस्य देखील असल्याचे उघड झाले असून, या संदर्भात पोलीस सखोल तपास करत आहेत. यामुळे पुण्यात गँगवॉर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरूवातीला फक्त सोमनाथ गायकवाड याच्या मुलाच्या हत्येचा कट होता, अशी माहिती होती. मात्र, आता मोठ्या गँगवॉरचा भडका पुण्याच उडणार होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
चॅटमधून अनेक संशयास्पद गोष्टी
मागील काही काळापासून अडिकार आणि सोमनाथ गायकवाड टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून वाद सुरू आहेत. कोमकर खून प्रकरणात अडिकार टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी केलेल्या चौकशीत, त्यांनी केवळ कोमकरचाच नाही, तर गायकवाड टोळीच्या काही प्रमुख सदस्यांनाही लक्ष्य करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीतील आरोपींच्या मोबाईल आणि सोशल मीडिया चॅटमधून अनेक संशयास्पद गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. यामध्ये गायकवाड टोळीतील सदस्यांची नावे, त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि हालचालींची माहिती गोळा केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
वनराजचा बदला घेण्यासाठी हत्या
गेल्या वर्षी (1 सप्टेंबर 2024) झालेल्या वनराज आंदेकरच्या (Vanraj Andekar Murder) हत्येच्या बदल्यासाठीच ही हत्या करण्यात आली. वनराजच्या हत्येप्रकरणी कल्याणी यांचे पती गणेश कोमकर आणि इतर कुटुंबीय तुरुंगात आहेत, तेव्हापासून आंदेकर टोळी बदला घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबावर पाळत ठेवून होती, असा आरोप कल्याणी कोमकरने केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास सुरू केला असून, दोन्ही टोळ्यांच्या सदस्यांवर बारीक नजर ठेवली आहे. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसतायेत.