फसवणूक करून लग्न लावलं
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आई-वडिलांची फसवणूक करून तिचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर तिचा पती गौरव तांबे हा मूल होण्यास असमर्थ (नपुंसक) असल्याचे तिला समजलं. यानंतर सासरा, पती आणि सासू यांनी 'वारसदार' मिळवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. 30 वर्षांच्या पीडित महिलेचं मागच्याच महिन्यात 35 वर्षांच्या मुलासोबत लग्न झालं होतं. मात्र, मुलगा नपुंसक निघाल्याचं पिडीतेने म्हटलं आहे.
advertisement
तुला मूल हवं असेल तर...
पिडिताने केलेल्या तक्रारीनुसार, पती गौरव आणि सासू श्रद्धा यांनी पीडितेला 'तुला मूल हवं असेल तर सासऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेव' असा दबाव आणला. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सासरा जयसिंग तांबे यांनी तिच्या बेडरूममध्ये घुसून शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार दिल्यावर त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणी नवऱ्यासोबत महाबळेश्वरला हनिमूनला गेली होती. त्यावेळी पतीचा खरा चेहरा समोर आला. हनिमूनवरून आल्यानंतरच सासऱ्याने रंग दाखवले.
सुनेकडे शरीर सुखाची मागणी
सासऱ्याने अनेकदा सुनेला धमकी देखील दिली होती. सुनेकडे शरीर सुखाची मागणी केली. नकार दिला तर परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकीही सासऱ्याने दिल्याचा आरोप सुनेने केला आहे. 5 जून ते 23 जून 2025 च्या दरम्यान वारंवार असे प्रकार सुनेसोबत घडत होते, असं देखील तक्रारीत म्हटलं आहे.
सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, तक्रारीनंतर सहकारनगर पोलिसांनी जयसिंग तांबे, त्यांचा मुलगा गौरव आणि पत्नी श्रद्धा यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.