11 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं
यापूर्वी विजयने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केलं होतं. अशातच रुग्णाने पुन्हा आत्महत्येचं पाऊल उचलल्याने ससून रुग्णालयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विजयवर रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याने रुग्णालयाच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपले आयुष्य संपवलं.
advertisement
हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू
दरम्यान, या घटनेनंतर ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सरकारी ससून रुग्णालयातील संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे कातकरी आदिवासी तरुणाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची घटना काल समोर आली होती. तब्बल दोन तास रुग्णालयाच्या जमिनीवर वेदनेने विव्हळत या तरुणाचा मृत्यू झाला. तब्बल दोन तास रुग्णालयाच्या जमिनीवर पडूनही त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत, असा गंभीर आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.