मौल्यवान चंदनाची झाडं चोरली
सदर घटना पहाटे 3.30 च्या सुमारास घडली असून चोरट्यांनी सरोदे यांच्या ऑफिसच्या आवारातील मौल्यवान चंदनाची झाडे कटरच्या सहाय्याने तोडून नेली आहेत. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी करण्यात आल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे. या प्रकारामुळे पुण्यातील उच्चभ्रू वस्तीतही आता चोरांचा वावर वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.
advertisement
पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल
असीम सरोदे यांनी या घटनेनंतर पुणे पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली असून शहरात चंदन चोरांची मोठी गॅंग सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात ठिकठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पोलिस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. पहाटेच्या वेळी शांततेचा फायदा घेऊन ही गॅंग अशा प्रकारे झाडांची कत्तल करत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता विशेष तपासचक्रं फिरवली आहेत.
