300 हून अधिक मकोका प्रस्ताव
एकेकाळी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी, वर्षातून 100 पेक्षा जास्त 'मकोका' (MCOCA) प्रस्ताव दाखल केले जात होते. गेल्या पाच वर्षांत 300 हून अधिक मकोका प्रस्ताव दाखल झाले, ज्यात 500 पेक्षा जास्त तरुण गुन्हेगारांचा समावेश होता. यातील अनेकजण 18 ते 21 वयोगटातील आहेत. त्यामुळे पुण्यातील तरुण गुन्हेगारी विश्वात का ओढले जात आहेत? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
गुन्हेगारीचं विद्यापीठ
परंतु, याच मकोका कायद्यामुळे एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. दोन-तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर, हे तरुण गुन्हेगार 'गुन्हेगारीच्या विद्यापीठात शिकून' अधिक सराईत बनत आहेत. जवळपास 350 पेक्षा जास्त असे गुन्हेगार मकोकातून सुटल्यानंतर शहरातल्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये सामील झाले आहेत. काहीजण तर स्वतःची नवीन टोळी तयार करत आहेत.
तरुण गुन्हेगारांचा सुळसुळाट
यामुळे, पुण्यात तरुण गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला असून, ते सामान्य नागरिकांवर दादागिरी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत पुणे पोलीस या नवगुन्हेगारांना कसे नियंत्रणात आणणार, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील मोठ्या टोळ्यांचे म्होरके अशाच नव्या गुन्हेगारांना हाताशी धरून आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारांनी पाळलेल्या नंबरकारींनी कोयत्याच्या माध्यमातून पुण्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी वेळीच या कोयता गँगच्या मेंबर्सला आवळण्याची गरज होती. त्यानंतर याच कोयत्या गँगच्या मेंबर्सने जेलमध्ये जाऊन गुन्हेगारीच्या विद्यापिठात शिक्षण घेतलं अन् गुन्हेगारी टोळ्या वाढल्याचं चित्र समोर आलं. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.