TRENDING:

Pune Crime : दसऱ्याला सोनं लुटलं, गोडधोड खाल्लं अन् सकाळी एकाच खोलीत सापडली नवरा बायकोची बॉडी! मध्यरात्री काय घडलं?

Last Updated:

Pune Crime News : दसऱ्याच्या आदल्या दिवशी गावडे यांच्या घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. मध्यरात्रीच्या सुमारास नेमकं काय झालं? पाहा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Daund Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पतीने आधी पत्नीची गळा दाबून हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाला वादाच्या भरात अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीच्या गळा दाबून खून केला. पत्नी मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक गावडेने राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. त्यामुळे गावकऱ्यांना घटना लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Pune Daund Crime Husband Ends Life
Pune Daund Crime Husband Ends Life
advertisement

दसऱ्याच्या आदल्या दिवशी काय घडलं? 

दोघेही पती-पत्नी शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. पत्नीचा खून केल्यानंतर अशोक गावडे यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गावडे यांच्या घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

advertisement

नवऱ्याने स्वत:ला संपवलं

अपराधीपणाची भावना मनात आल्यामुळे नवऱ्याने स्वत:ला देखील संपवलं. अशोक यांनी राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली. ऐन सणासुदीत अशा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेचं नेमकं कारण स्पष्ट

दरम्यान, घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. याबाबत माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे. मात्र, गावात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : दसऱ्याला सोनं लुटलं, गोडधोड खाल्लं अन् सकाळी एकाच खोलीत सापडली नवरा बायकोची बॉडी! मध्यरात्री काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल