सध्या पुण्यातून दिल्ली किंवा बंगळुरूकडे जाण्यासाठी थेट गाड्या उपलब्ध नाहीत. दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी झेलम एक्स्प्रेस हा मुख्य पर्याय आहे, तर बंगळूरुसाठी उद्यान, कोयम्बतूर आणि संपर्क क्रांती या गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना या मार्गांवर थेट सोय मिळत नाही. याच कारणामुळे पुण्याहून दिल्ली आणि बंगळुरूकडे स्वतंत्र गाड्या चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. या गाड्यांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
advertisement
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, पुणे–मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण, आता रेल्वेचा वेग होणार सुसाट
पुणे स्थानक ओव्हरलोड
पुणे स्टेशनवर रोज दोन लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. मात्र स्टेशनला फक्त सहा फलाट असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. पुणे स्थानकातून दररोज 72 गाड्या सुटतात आणि एकूण 210 गाड्या या मार्गावरून धावत असतात. गाड्यांची व प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढते. फलाट मोकळे नसल्याने दक्षिणेकडून येणाऱ्या काही गाड्या हडपसर येथे थांबवाव्या लागतात. तसेच सीएसएमटीकडून येणाऱ्या गाड्यांना शिवाजीनगर किंवा त्यापुढे थांबावे लागते, ज्यामुळे प्रवासात उशीर होतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासन हडपसर आणि खडकी या स्थानकांचा टर्मिनल म्हणून जास्त वापर करण्याचे नियोजन आहे.
विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य आनंद सप्तर्षी यांनी सांगितले की, पुण्यातून थेट दिल्ली आणि बंगळूरुदरम्यान रेल्वे सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या दोन्ही शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पुण्यातून सर्वाधिक आहे. खडकी स्थानकावरून गाड्या सुरू झाल्यास पुणेकरांना मोठी सोय होईल आणि प्रवास अधिक सुलभ होईल.






