Pune Parking: पुणेकर पार्किंगचं नो टेन्शन! शहरात 6 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा, लोकेशन आणि शुल्क

Last Updated:

Pune Parking: पुणेकरांना पार्किंगच्या कटकटीतून दिलासा मिळणार आहे. शहरात 6 ठिकाणी पे अँड पार्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणेकर पार्किंगचं नो टेन्शन! शहरात 6 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा, लोकेशन आणि शुल्क
पुणेकर पार्किंगचं नो टेन्शन! शहरात 6 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा, लोकेशन आणि शुल्क
पुणे : सात वर्षे रखडलेली पुण्यातील पे अँड पार्क वाहनतळ योजना अखेर प्रत्यक्षात येत आहे. पुणे महापालिकेने अंमलबजावणीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत सहा रस्त्यांसाठी निविदा जाहीर केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच दिलेल्या मंजुरीनंतरही विविध कारणांमुळे ही योजना अडगळीत पडली होती. मात्र, वाढती वाहनसंख्या, पार्किंगची कमतरता आणि वाहतूक कोंडीचा वाढता ताण पाहता अखेर प्रशासनाने हा निर्णय गतीने राबविण्याचा मार्ग निवडला आहे.
या सहा ठिकाणी पार्किंग सुविधा
प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार निवडीसाठी आठ दिवसांचा कालावधी दिला असून, पात्र ठरणाऱ्या ठेकेदाराला तीन वर्षांचा कालावधी कराराद्वारे देण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर निवडलेले सहा रस्ते पुढीलप्रमाणे असून जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी, बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर परिसर. यावर नगरपालिका निश्चित दरांनुसार पार्किंग व्यवस्था निर्माण करणार आहे.
advertisement
शुल्क किती?
दर निश्चितीमध्ये दुचाकीसाठी प्रतितास 4 रुपये तर चारचाकीसाठी प्रतितास 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे दर महापालिकेच्या विद्यमान मक्ता पद्धती वाहनतळांच्या दरांपेक्षा (दुचाकी 8 रुपये व चारचाकी 14 रुपये) अधिक आहेत. मात्र, पे अँड पार्कसाठी रस्त्यावर उपलब्ध होणारी सोय, देखरेख आणि नियंत्रण या दृष्टीने हे शुल्क वाजवी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
advertisement
38 रस्त्यांचा सर्व्हे अन् निर्णय
या योजनेबाबत महापालिकेने 2018 मध्ये निर्णय घेतला होता. परंतु नागरिकांचा विरोध, विविध संस्थांचे आंदोलन आणि निवडणूकपूर्व राजकीय मतभेदांमुळे योजना मागे घ्यावी लागली. त्यावेळी 38 रस्त्यांचा सर्व्हे करून प्रस्ताव महापौरांकडे पाठविण्यात आला होता. प्रशासनाने वारंवार स्मरणपत्रे देऊनही निर्णय प्रलंबित राहिला. अखेर वाहतूक कोंडीचा वाढता ताण आणि वाहनसंख्येतील विक्रमी वाढ लक्षात घेऊन प्रायोगिक मार्गावर योजनेला पुन्हा हिरवा कंदील देण्यात आला.
advertisement
कुठं किती पार्किंग क्षमता?
प्रत्येक रस्त्यावर उपलब्ध वाहनसंख्येनुसार पार्किंगची क्षमता निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, बालेवाडी हायस्ट्रीटवर 199 चारचाकी तर दुचाकीसाठी 888 तर बिबवेवाडीत 920 दुचाकीसाठी तर चारचाकी वाहनांची मर्यादा 75, जंगली महाराज रस्ता दुचाकी 856, चारचाकी 51, फर्ग्युसन रस्त्यावर दुचाकीसाठी 804 तर चारचाकी 108 तसेच विमान नगर रस्त्यावर दुचाकी वाहन 490 तर चारचाकी 185 मर्यादा आहे. लक्ष्मी रस्त्यावर दुचाकीसाठी 238 तर चारचाकीसाठी 60 वाहनांना जागा उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून रस्त्यांवरील अव्यवस्थित पार्किंग आटोक्यात येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
advertisement
योजना यशस्वी ठरल्यास पुढील काही महिन्यांत शहरातील आणखी रस्त्यांवर पे अँड पार्क पद्धती लागू करण्याचा विचार प्रशासनाने व्यक्त केला आहे. आता ही योजना प्रत्यक्षात कशी राबविली जाईल आणि नागरिकांचा प्रतिसाद काय मिळेल, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Parking: पुणेकर पार्किंगचं नो टेन्शन! शहरात 6 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा, लोकेशन आणि शुल्क
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement