TRENDING:

डॉक्टरांनीही मानली होती हार, पण नर्सच्या खोकल्याने वाचवले मुलीचे प्राण; पुण्याच्या रुग्णालयातील अजब घटना

Last Updated:

या चिमुरडीला गेल्या आठ महिन्यांपासून खोकल्याचा प्रचंड त्रास होत होता. रात्रीच्या वेळी खोकल्याची उबळ येणे आणि घशात सतत खवखवणे यामुळे ती त्रस्त होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरात एका ६ वर्षांच्या मुलीच्या सततच्या खोकल्याचे असे काही विचित्र कारण समोर आले आहे, ज्याचा विचार तिच्या पालकांनीही कधी केला नव्हता. गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टरांसाठी आव्हान ठरलेल्या या खोकल्याचे मूळ अखेर तिच्या आईच्या 'परफ्युम'मध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नर्सच्या खोकल्याने वाचवले मुलीचे प्राण (AI Image)
नर्सच्या खोकल्याने वाचवले मुलीचे प्राण (AI Image)
advertisement

नेमकी काय होती समस्या?

या चिमुरडीला गेल्या आठ महिन्यांपासून खोकल्याचा प्रचंड त्रास होत होता. रात्रीच्या वेळी खोकल्याची उबळ येणे आणि घशात सतत खवखवणे यामुळे ती त्रस्त होती. अनेक डॉक्टरांकडे उपचार केले, विविध चाचण्या केल्या, एक्सरे काढले. परंतु खोकल्याचे नेमके कारण समजत नव्हते. औषधे घेऊनही तिला गुण येत नव्हता.

नर्सच्या खोकल्यामुळे लागला छडा:

advertisement

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये या मुलीवर उपचार सुरू असताना एक रंजक घटना घडली. तपासणी दरम्यान मुलीची आई डॉक्टरांशी बोलत असताना, जवळच उभी असलेली परिचारिका (नर्स) अचानक खोकायला लागली. डॉक्टरांनी विचारणा केली असता, मुलीच्या आईने लावलेल्या परफ्युमचा सुगंध खूप तीव्र असून त्यामुळे आपल्याला खोकला येत असल्याचे नर्सने सांगितले. हीच बाब डॉक्टरांसाठी तपासाचा टप्पा ठरली.

advertisement

Pune Crime: दरवाजा वाजवला; तरुणीने उघडताच दोघं घरात घुसले अन्...कोरेगाव पार्कमधील घटनेनं खळबळ

बालरोगतज्ज्ञ डॉ. मौनिश बालाजी यांनी या घटनेवरून अंदाज बांधला की, मुलीच्या खोकल्याचे कारणही हा सुगंध असू शकतो. त्यांनी आईला काही दिवस परफ्युम न वापरण्याचा सल्ला दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आईने परफ्युम वापरणे बंद करताच अवघ्या १५ दिवसांत मुलीचा ८ महिन्यांपासूनचा जुना खोकला पूर्णपणे बरा झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल झणझणीत, मसालेदार आगरी पद्धतीनं बनवा चिंबोरी रस्सा, रेसिपीचा Video
सर्व पहा

पालकांसाठी डॉक्टरांचा इशारा: तीव्र सुगंधामुळे लहान मुलांच्या श्वसनमार्गाला सूज येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. केवळ परफ्युमच नव्हे, तर एअर फ्रेशनर, डास पळवणारे स्प्रे, अगरबत्ती, आणि तीव्र सुगंधी डिटर्जंट यांमुळेही मुलांना अ‍ॅलर्जी होऊन खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी घरात अशा गोष्टींचा वापर मर्यादित ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
डॉक्टरांनीही मानली होती हार, पण नर्सच्या खोकल्याने वाचवले मुलीचे प्राण; पुण्याच्या रुग्णालयातील अजब घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल