TRENDING:

Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेचा मास्टर प्लॅन, औंध रस्त्याबाबत मोठा निर्णय

Last Updated:

Pune Traffic: पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे मुख्य रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी जाणवते. औंध रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे – वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. आता वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक भर पडणार आहे. आनंदऋषीजी चौकात (विद्यापीठ चौक) नुकताच दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला असून आता त्याला जोडणाऱ्या रस्त्यांच्या आराखड्यात सुधारणा करण्यात आली आहे. सेनापती बापट रस्त्यावरून औंधकडे जाण्यासाठी ग्रेड सेपरेटर, तसेच बाणेर–पाषाणकडे जाण्यासाठी दोन मार्गिकांचा कनेक्टिंग रॅम्प उभारला जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेचा मास्टर प्लॅन, औंध रस्त्याबाबत मोठा निर्णय
Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेचा मास्टर प्लॅन, औंध रस्त्याबाबत मोठा निर्णय
advertisement

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला. या पुलाच्या पहिल्या स्तरावर दुहेरी वाहतूक व्यवस्थापन तर वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका ठेवण्यात आली आहे. परंतु सुरुवातीच्या आराखड्यात सेनापती बापट रस्त्यावरील जोडणी विचारात घेतली नव्हती. त्यानंतर करण्यात आलेल्या बदलांमुळे आता हा महत्त्वाचा मार्गही उड्डाणपुलाशी जोडला जाणार आहे.

advertisement

Pune Double Decker Bus: वाहतूक कोंडीचा प्रश्नच सुटणार, पुण्यात डबल डेकर बस धावणार, कुठं आणि कधी? संपूर्ण माहिती

ग्रेड सेपरेटर हा खुडे चौकाकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असेल. त्याची लांबी 210 मीटर व रुंदी 8 मीटर (दोन मार्गिका) इतकी असणार आहे. या व्यवस्थेमुळे सेनापती बापट रस्त्यावरून थेट औंधकडे जाता येणार आहे. त्याचबरोबर बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात येणार असून त्याची लांबी 152 मीटर आणि रुंदी 12 मीटर (दोन मार्गिका) असेल. या आराखड्यातील बदलामुळे आधी नियोजित ग्रेड सेपरेटरची लांबी 300 मीटरने कमी करण्यात आली आहे.

advertisement

या प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याची माहिती प्रकल्प विभाग प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या नव्या सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर व पाषाण या भागांमध्ये वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे मुख्य रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी जाणवते. विशेषतः विद्यापीठ चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठिकाण आहे. अशा स्थितीत उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि कनेक्टिंग रॅम्प हे प्रकल्प वाहनचालकांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेचा मास्टर प्लॅन, औंध रस्त्याबाबत मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल