TRENDING:

Sahyadri Hospital: शिवसैनिकांकडून तोडफोड; सह्याद्री रुग्णालयात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Last Updated:

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर डॉक्टरांनी योग्य आणि वेळेवर उपचार न केल्यामुळेच संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे संतप्त नातेवाईक आणि शिवसैनिकांनी जोरदार तोडफोड केली. हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, संतप्त जमावाने हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला आणि परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
रुग्णालयात तोडफोड
रुग्णालयात तोडफोड
advertisement

शिंदे गट शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्षाचे शहरप्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांसोबत ही घटना घडली.

डॉक्टरांनी सांगितलं, की दोन दिवसात वडील व्यवस्थित होतील. २८ तारखेला ऑपरेशन झालं, वडील व्यवस्थितही झाले. सगळ्यांशी बोलतही होते. मात्र, दोन दिवसातच डॉक्टरांनी त्यांना जबरदस्तीने खुर्चीवर बसवलं, ज्यामुळे त्यांचे टाके तुटले, असा आरोप सपकाळ यांनी केला. या गंभीर घटनेबाबत डॉक्टरांनी कुठलीही माहिती न दिल्याचेही ते म्हणाले. इन्फेक्शन झालं आहे एवढेच सांगत रुग्णाला स्कॅनसाठी नेण्यात आले.

advertisement

अल्सरचं ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसात पाणी झालं, हे डॉक्टरांनी लपवलं. चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला.

रात्रीची वेळ; रस्त्यावर उभा होता टेम्पो, जवळ जाताच पोलिसांचा संशय खरा ठरला, पुण्यातील थरार

advertisement

या घटनेची माहिती मिळताच शिंदे गटाचे काही शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त नातेवाईकांसोबत मिळून हॉस्पिटल प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान रुग्णालयाच्या आवारात आणि बाह्यभागात तोडफोड करण्यात आली. जमावाने रुग्णालयाच्या बाहेर बराच वेळ ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं होतं. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाच्या आरोपांची सत्यता तपासणीअंती स्पष्ट होईल. परंतु या घटनेने खासगी रुग्णालयातील उपचारांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

संबंधित घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. यात काही लोक रुग्णालयाच्या काचांवर दगड फेकताना तसंच तोडफोड करताना दिसत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Sahyadri Hospital: शिवसैनिकांकडून तोडफोड; सह्याद्री रुग्णालयात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल