रात्रीची वेळ; रस्त्यावर उभा होता टेम्पो, जवळ जाताच पोलिसांचा संशय खरा ठरला, पुण्यातील थरार

Last Updated:

होलेवाडी येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास एक टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा दिसला. टेम्पोत एकूण पाच जण होते आणि पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू करताच त्यातील दोघांनी पळ काढला.

टेम्पोमध्ये होते चोर (प्रतिकात्मक फोटो)
टेम्पोमध्ये होते चोर (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांना आंतरराज्य दरोडेखोर टोळीला जेरबंद करण्यात मोठं यश मिळालं आहे. राजगुरूनगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुजरातमधील गोध्रा येथील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होतं. यावेळी त्यांना होलेवाडी येथे रात्री पावणेदहाच्या सुमारास एक टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा दिसला. टेम्पोत एकूण पाच जण होते आणि पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू करताच त्यातील दोघांनी पळ काढला. मात्र इरफान अब्दुलअमीद दुर्वेश (वय ४२), मोहम्मद अली हुसेन रेहमत (वय २१) आणि उमरफारूख अब्दुलसत्तार (वय ३६, तिघेही रा. गोध्रा, गुजरात) या तिघांना जागेवरच पकडण्यात पोलिसांना यश आलं.
या आरोपींकडून पोलिसांनी गज, रॉड, कटावणी (पाहार), बॅटरी, लोखंडी धार असलेली पट्टी, कटर आणि चॉपर असा दरोड्यासाठी लागणारा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
आळेफाटा, मंचर आणि सिन्नर या पोलीस स्टेशनच्या हद्दीतही त्यांचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ट्रकमधून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे टायर चोरल्याचे मोठे प्रकरणही या टोळीने केल्याचे उघड झाले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पळून गेलेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. हे चोर अशाप्रकारे थांबलेले असताना रात्रीही त्यांचा चोरीचा उद्देश होता, हे निश्चित. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचा हा डाव उधळून लावण्यात यश आलं
view comments
मराठी बातम्या/पुणे/
रात्रीची वेळ; रस्त्यावर उभा होता टेम्पो, जवळ जाताच पोलिसांचा संशय खरा ठरला, पुण्यातील थरार
Next Article
advertisement
ED Raids In Baramati : एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणी कारवाई
एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण
  • एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण

  • एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण

  • एकाचवेळी 5 ठिकाणी धाड, ईडीच्या कारवाईने बारामतीत खळबळ, कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण

View All
advertisement