हे पुण्यातच होऊ शकतं! फुटपाथवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांची तरुणीनं रस्त्यातच ओवाळली आरती, Video
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
विशेषतः पुण्यातील लोकांची चुकीच्या व्यक्तीचा अपमान करण्याची शैली आणि पुणेरी टोमणे तर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.अशातच आता हेच दाखवणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
पुणे : 'पुणे तिथे काय उणे' हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पुण्यात अगदी काहीही घडू शकतं, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंही आहे. विशेषतः पुण्यातील लोकांची चुकीच्या व्यक्तीचा अपमान करण्याची शैली आणि पुणेरी टोमणे तर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.अशातच आता हेच दाखवणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल
व्हिडीओमध्ये एक तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर उभा असलेली दिसते. यानंतर ती जे काही करते, ते पाहून तुम्हाला हसूही येईल. मात्र, तरी तिचं हे कृत्य बरोबरही वाटेल. ही तरुणी फुटपाथवर उभा असतानाच काही वेळातच तिथून दोन दुचाकी जाताना दिसतात. फुटपाथवरून जाणाऱ्या या दुचाकीस्वारांना काहीही न बोलता या तरुणीने त्यांची थेट आरतीच ओवाळली.
advertisement
या घटनेमुळे पुढच्या वेळी असं लाजिरवाणं कृत्य करताना दुचाकीस्वारही नक्कीच विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरुणी हे सगळं करत असताना एका कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
एका तरुणाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की एनसीएलच्या मैदानावरील मॅच संपल्यानंतर घरी येताना पाषाणमध्ये भरपूर ट्रॅफिक होतं. त्यामुळे जी जागा चालण्यासाठी (फुटपाथ) आहे तिथून दुचाकीस्वार आपली गाडी नेत होते. त्यामुळे चालत येणाऱ्या महिलेनं त्यांची आरती उतरवली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हे पुण्यातच होऊ शकतं! फुटपाथवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांची तरुणीनं रस्त्यातच ओवाळली आरती, Video










