रास्ता पेठेत राहणाऱ्या या तरुणीने लग्नासाठी एका लोकप्रिय विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती. नोंदणी केल्यानंतर एका सायबर चोरट्याने तिच्याशी संपर्क साधला आणि आपण लग्न करू, असं आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने अचानक वेगवेगळ्या भावनिक किंवा तातडीच्या गरजांची कारणं सांगून तरुणीकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तरुणीनेही त्याच्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी त्याच्या बँक खात्यात सहा लाख रुपये जमा केले.
advertisement
Nashik News : आठ तोळ सोन हिसकावलं आणि आता पत्र पाठवून तलाक तलाक म्हटलं; पतीविरोद्धात गुन्हा दाखल
पैसे मिळाल्यानंतर त्या चोरट्याने तरुणीसोबत बोलणं टाळण्यास सुरुवात केली आणि अखेरीस आपला मोबाईल क्रमांक बंद केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीने नुकतीच पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विवाहविषयक संकेतस्थळावरून फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वीही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. तसंच, नोंदणी करताना प्रोफाइलची योग्य खातरजमा करावी आणि कोणत्याही परिस्थितीत पैशांची मागणी झाल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये, असं महत्त्वाचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
